Thursday, 7 August 2014

काही घटना - CRITICAL ANGLE


     १. नैसर्गिक आपत्ती 


                 वेळ दुपारी एकच्या सुमारासची …. पुण्यातील एका मोठ्या I.T.  कंपनी मध्ये काम करणारी माझी एक मैत्रीण व तिचा ग्रुप …. चर्चेचा विषय टि . व्ही . वरील ब्रेकिंग न्यूज - माळीन गावातील दुर्घटना !!! चर्चेमध्ये सहानुभूतीच्या भावनेला भीतीच्या भावनेने केव्हाच मागे टाकले . अत्यंत सुशिक्षित  समजल्या जातात अश्या Software Engineer असणाऱ्या माझ्या मैत्रिणीचे पुढील वाक्य ऐकले आणि मनाला खूप वाईट वाटले. वाक्य होते - " इतक्या जणांचा अचानक मृत्यू झाल्याने आता तिथे भूतांचा डोंगर तयार होईल "!!!
                  घडलेल्या दुर्घटनेबाबत नैसर्गिक आपत्तीसंबंधी चर्चा न करता , त्यासाठी कुठलीही मदत न पाठवता, भविष्यात अशा घटना वेळेआधी कळावीत म्हणून काही Innovative पर्यायांची चर्चा न करता, किमान हळहळ देखील व्यक्त न करता या Software Engineer ला त्या जागेवर मेलेल्या माणसांची भूते होतील हे सुचनेच खरे दुर्दैव म्हणायचे!!!
       
   

     २. सामाजिक कार्ये 


                   नेहमीप्रमाणे CRY या संस्थेला देणगीचे पैसे Online पद्धतीने देण्याची प्रक्रीया चालू होती. माझेच काही शालेय मित्र चाललेली प्रक्रीया पाहून चिडले आणि म्हणाले - असे फुकट पैसे नेत्यांना वाटणे म्हणजे मूर्खपणाचे होय. मी जेव्हा त्यांना सांगितले की CRY हि एक विश्वस्त संस्था आहे वगैरे वगैरे तेव्हा त्यांनी दहा वेगवेगळी उदाहरणे देऊन हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की देशात सर्व NGO  भ्रष्टाचार करण्यासाठीच निर्माण झाल्या आहेत!!!
             
               सामाजिक कार्याचे व्रत हाती घेतलेल्या आणि निस्वार्थपणे प्रसंगी पदरचे पैसे टाकून सामाजिक कर्तव्य निभावणार्या कितीतरी NGO'S आजही जगात कार्यरत आहेत यावर सध्याच्या तरुण पिढीचा विश्वास नाही. सरसकट सगळेच नेते भ्रष्ट आणि सगळ्याच NGO'S भ्रष्ट असे हे लोक मानतात!!! खरा मूर्खपणा कशात आहे हे त्यांना समजावून सांगणे हे खरच कठीण काम वाटते!!!


    ३. अर्थशास्त्र


                  रश्मी बन्सल या माझ्या आवडत्या लेखिकेचे एक वाक्य मला खूप आवडते -" आजचे जग हे ज्याला अर्थशास्त्र चांगले समजते त्यांच्यासाठी खुल्या संधींचे महासागर आहे." कुठल्याही सुज्ञ माणसाने १००% सहमत व्हावे असे हे वाक्य आहे. इथे मात्र मला वर्तमान पत्रात धक्कादायक बातम्या वाचायला मिळत आहेत. KBC  प्रकरण हे खरच घडून गेलं यावर विश्वास बसत नाहीये!! " पैसे गुंतवा - अल्पावधीत दुप्पट-चौपट मोबदला मिळेल " यावर अजूनही आपल्याकडील लोकं ( सुशिक्षित देखील! ) विश्वास ठेवतात हेच मुळी  अविश्वसनीय वाटते!!!
           
      अर्थशास्त्र हे खरतरं जगाला भारताने दिलेली देणगी!! चाणक्याने २००० वर्षांपूर्वी दिलेली शिकवण फसलेल्या माणसांपैकी कुणीही वाचली असती तर तो नक्कीच फसला नसता!!! सांगण्याचे तात्पर्य एवढेच की - प्रत्येक भारतीयाला अर्थशास्त्राचे किमान ज्ञान असायला हवे. आपल्या देशाचे एकूण  उत्पन्न किती ? त्यापैकी कुठल्या मार्गाने सर्वाधिक उत्पन्न मिळते ? भारताचा कुठे कुठे आणि किती खर्च होतो ? शिक्षणावर तसेच संरक्षणावर इतर देशांच्या तुलनेत आपण किती टक्के खर्च करतो ? आपल्या देशावर किती कर्ज आहे ? इत्यादी प्रश्नांची उत्तरे आपणास माहित असायलाच हवी. हे शक्य नसेल तर किमान KBC  सारख्या फसव्या उद्योगांच्या नादी  कुठलीही भारतीय व्यक्ती लागू नये - एवढेच!!!!!


                                                          * AMBITION *