गेल्या २-३ वर्षांपासून - संपुर्ण भारतातील विविध विचारसरणीच्या व्यक्तींशी नवनवीन विषयांवर चर्चा करण्याची संधी मला मिळत आली आहे. आज माझे अध्यात्म या विषयावरील विचार व्यक्त करण्यापूर्वी मी काही सतत विचारल्या जाण्याऱ्या प्रश्नांची उत्तरे देऊ इच्छितो. .
Q- Do you believe in god?
Ans- It depends on to whom do you consider as god.
Q- What do you think about Atma, Swarga and Narka, etc..Do they exist?
Ans- I don't know. And to say more about it- I really don't want to know.
Q- Are you an Atheist?
Ans- No. I am not completely an atheist.
आता मुळ विषयावर येण्यापूर्वी माझ्यासाठीचा एक यक्षप्रश्न -
माझा एक Atheist (नास्तीक) मित्र आहे - दर्शन त्याचं नाव. (त्याच्या या छानश्या नावामध्ये आणि व्यक्तिमत्वामध्ये बराच फरक आहे, हे मी इथे आवर्जून नमूद करू इच्छितो.) त्याचा आवडता छंद म्हणजे आम्हा मित्रांना दरवेळी बुद्धीला ताण देणारे नवीन प्रश्न विचारणे होय . अशातच त्याने ( काहीसा जुनाच परंतु वेगळाच ) एक प्रश्न उपस्थित करून अनेकांना (इथल्या आस्तिक मंडळींना) त्रास देणे सुरु केले आहे .
प्रश्न - जर सर्व माणसांमध्ये देव आहे तर मग चोरी, बलात्कार, दरोडे, नक्सली हल्ले, इ कृत्ये करणाऱ्या माणसांमध्येही देव असतो का ? असतो तर देवच हे घडवतो का ? (कारण देवाने सर्व नियती आधीच ठरवलेली असते ना !! सर्व गोष्टींचा कर्ता -कर्वीता तर देवच असतो ना !! )आणि नसतो तर मग देव काय फ़क़्त चांगल्या व्यक्तींमध्येच असतो का ?
त्याच्या या प्रश्नाने खरं तर मला बराच विचार करण्यास भाग पाडले . For a while he (then) succeeded in making me at least (temporarily)An Agnostic!! परंतू आज मला वाटतंय की या प्रश्नाचे उत्तर मला सापडले आहे . माझे उत्तर या blog च्या पुढच्या post मध्ये .... तोपर्यंत तुम्हीही नक्कीच विचार करा.
*AMBITION*