धूसर प्रकाश
- शक्यतेचा
असावे चिंतन बहुदा,
- सरणापुढील...
सारे काही संपूर्ण.
संपूर्णच.
सर्वार्थाने.
सुटलेल्या गोष्टींचा स्विकार;
-तोही संपूर्णच
-सर्वार्थाने
सर्वदूर दिसताहेत
मने हसणारी
अन क्वचितच कुठेतरी
उगीच रुसनारी
ती सगळी दिसताहेत
तशीच संपूर्ण ...
प्राप्त गोष्टींचा
अहंकारही आहेच!!
पण किती ??
अन किती वेळ ???
आता तीव्र ऊन
-तीव्र....
डोळ्यांसमोर
संघर्ष केलेला
कशासाठी?
जे भोगले त्याने भागले का?
हाच एक प्रश्न ?
संघर्ष !!
प्रश्न ?
संघर्ष !!
सगळे सोबती
मित्र, नाते अन कुटुंब
मित्र !!!
मित्रच सारे....
सोहळे आनंदाचे
जीत आणि हार
आनंदच दोन्ही...
देणारे सगळे
मित्रच सारे ...
आता फक्त
आठवणीच
दुसरं काय ?
आठवणीच
आभाळातील सारे तारे
आठवणीच
अवकाशातील सारे दृश्य
आठवणीच
अवकाशातील
काळोख आणि उजेड
वेळ आणि जागा
सारे काही सारखेच..
आयुष्यातील
सुख आणि दुःख
चांगले आणि वाईट
सारे काही सारखेच..
म्हणून
फक्त आठवणीच
संपूर्ण ..
संपूर्ण ..
*AMBITION*