A COMMON MAN HAS LIMITATIONS FOR THE USE OF UNLIMITED SOURCES TO IMPROVE HIS LIFE!! LIFE WILL NOT BE ALWAYS FULL WITH ONLY THOSE EVENTS, THAT CREATOR MADE FOR US!! MUCH OF ITS PORTION WILL BE DESIRED IF WE WANT.... I THINK WHAT WE NEED IS TO GIVE 'SAJ' TO EVERY POSSIBLE THOUGHT AND THINGs.
Tuesday, 13 January 2015
MY PUNJABI ROOMMATES!!
For those persons on this planet who never interacted with Punjabis - "you perhaps have missed the best friendship and great hospitality." And if any of you have/had any Punjabi as roommate then I am sure that you have/had seen both the heaven and hell within your room!!
He is the most nostalgic person in our block. He used to share stories from his school and college days with us and every-time a new one!! Every-time he logged in Facebook - he find many of his friends online for chatting. One must appreciate his amazing speed of chatting,typing,insertion of variety of smilies etc.. He used to chat with more than 10 friends at a time being ahead of everyone there!! sometimes any of our roommate comes online then he starts chatting with him online within room only!! Apart from social networking he have a fantastic hobby of shopping.
*16 GB Pen Drive- 10 pieces each for just 02 Rs!! (I too got one from him :) )
There are some people on this planet who never feel sadness! KD is such a jolly person. He manages to be happy at every situation. (Unlike A.K.) Our KD has no regrets from past. He has a wide range of hobbies. Gaming,Travelling, Boozing, Music, chatting, etc.. I must appreciate his humor. He has the ability to create joke from all the things happening around! One more nice thing about KD is he is very good at giving surprises to us on every special occasion. I remember his gift for me on my B.Day. It was a humiliating call from an anchor of Radio Mirchi!!!
Thursday, 7 August 2014
काही घटना - CRITICAL ANGLE
१. नैसर्गिक आपत्ती
वेळ दुपारी एकच्या सुमारासची …. पुण्यातील एका मोठ्या I.T. कंपनी मध्ये काम करणारी माझी एक मैत्रीण व तिचा ग्रुप …. चर्चेचा विषय टि . व्ही . वरील ब्रेकिंग न्यूज - माळीन गावातील दुर्घटना !!! चर्चेमध्ये सहानुभूतीच्या भावनेला भीतीच्या भावनेने केव्हाच मागे टाकले . अत्यंत सुशिक्षित समजल्या जातात अश्या Software Engineer असणाऱ्या माझ्या मैत्रिणीचे पुढील वाक्य ऐकले आणि मनाला खूप वाईट वाटले. वाक्य होते - " इतक्या जणांचा अचानक मृत्यू झाल्याने आता तिथे भूतांचा डोंगर तयार होईल "!!!
घडलेल्या दुर्घटनेबाबत नैसर्गिक आपत्तीसंबंधी चर्चा न करता , त्यासाठी कुठलीही मदत न पाठवता, भविष्यात अशा घटना वेळेआधी कळावीत म्हणून काही Innovative पर्यायांची चर्चा न करता, किमान हळहळ देखील व्यक्त न करता या Software Engineer ला त्या जागेवर मेलेल्या माणसांची भूते होतील हे सुचनेच खरे दुर्दैव म्हणायचे!!!
२. सामाजिक कार्ये
नेहमीप्रमाणे CRY या संस्थेला देणगीचे पैसे Online पद्धतीने देण्याची प्रक्रीया चालू होती. माझेच काही शालेय मित्र चाललेली प्रक्रीया पाहून चिडले आणि म्हणाले - असे फुकट पैसे नेत्यांना वाटणे म्हणजे मूर्खपणाचे होय. मी जेव्हा त्यांना सांगितले की CRY हि एक विश्वस्त संस्था आहे वगैरे वगैरे तेव्हा त्यांनी दहा वेगवेगळी उदाहरणे देऊन हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की देशात सर्व NGO भ्रष्टाचार करण्यासाठीच निर्माण झाल्या आहेत!!!
सामाजिक कार्याचे व्रत हाती घेतलेल्या आणि निस्वार्थपणे प्रसंगी पदरचे पैसे टाकून सामाजिक कर्तव्य निभावणार्या कितीतरी NGO'S आजही जगात कार्यरत आहेत यावर सध्याच्या तरुण पिढीचा विश्वास नाही. सरसकट सगळेच नेते भ्रष्ट आणि सगळ्याच NGO'S भ्रष्ट असे हे लोक मानतात!!! खरा मूर्खपणा कशात आहे हे त्यांना समजावून सांगणे हे खरच कठीण काम वाटते!!!
३. अर्थशास्त्र
रश्मी बन्सल या माझ्या आवडत्या लेखिकेचे एक वाक्य मला खूप आवडते -" आजचे जग हे ज्याला अर्थशास्त्र चांगले समजते त्यांच्यासाठी खुल्या संधींचे महासागर आहे." कुठल्याही सुज्ञ माणसाने १००% सहमत व्हावे असे हे वाक्य आहे. इथे मात्र मला वर्तमान पत्रात धक्कादायक बातम्या वाचायला मिळत आहेत. KBC प्रकरण हे खरच घडून गेलं यावर विश्वास बसत नाहीये!! " पैसे गुंतवा - अल्पावधीत दुप्पट-चौपट मोबदला मिळेल " यावर अजूनही आपल्याकडील लोकं ( सुशिक्षित देखील! ) विश्वास ठेवतात हेच मुळी अविश्वसनीय वाटते!!!
अर्थशास्त्र हे खरतरं जगाला भारताने दिलेली देणगी!! चाणक्याने २००० वर्षांपूर्वी दिलेली शिकवण फसलेल्या माणसांपैकी कुणीही वाचली असती तर तो नक्कीच फसला नसता!!! सांगण्याचे तात्पर्य एवढेच की - प्रत्येक भारतीयाला अर्थशास्त्राचे किमान ज्ञान असायला हवे. आपल्या देशाचे एकूण उत्पन्न किती ? त्यापैकी कुठल्या मार्गाने सर्वाधिक उत्पन्न मिळते ? भारताचा कुठे कुठे आणि किती खर्च होतो ? शिक्षणावर तसेच संरक्षणावर इतर देशांच्या तुलनेत आपण किती टक्के खर्च करतो ? आपल्या देशावर किती कर्ज आहे ? इत्यादी प्रश्नांची उत्तरे आपणास माहित असायलाच हवी. हे शक्य नसेल तर किमान KBC सारख्या फसव्या उद्योगांच्या नादी कुठलीही भारतीय व्यक्ती लागू नये - एवढेच!!!!!
* AMBITION *
Wednesday, 18 September 2013
विचारवंताना समजावून घेतांना
आता दिल्लीमध्ये येऊन मला वर्ष होत आहे. त्यामुळे दिल्ली कशी आहे? तुला करमतं का रे तिथं? असे प्रश्न विचारणे आता बंद झालेत. पण संपतात त्यांना प्रश्न म्हणत नाहीत, किमान घरच्यांचे किंवा जवळच्या मित्रांचे प्रश्न तर मुळीच नाही!! तेव्हा आता त्यांनी नवीन प्रश्नमालिका सुरु केलीय- तुला दिल्ली सोडावी वाटत नाहीये ना? तुला घराची आठवणच येत नाही वाटतं? तुला दिल्लीतच सेटल व्हावं वाटतंय का? इ..
खरं तर बऱ्याचदा काही प्रश्नांना उत्तरे दयायची इच्छा नसतानाही किंवा उत्तरे माहित नसतानाही आपल्याला त्यांना सामोरे जावं लागतं!! तेव्हा अशा प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मी हल्ली सातत्त्याने जे वाक्य वापरतो त्यासाठी मी श्री नंदन निलेकनी यांचे भरपूर आभार मानतो. त्यांनी आपल्या 'Imagining India' या पुस्तकात एका ठिकाणी लिहीले आहे कि- "Decisions are always easy when you have no option left with you."
मला या काही मोठ्या माणसांच्याबद्दल आदर असण्याचे हेही एक कारण आहे कि ह्या लोकांनी जगाला दिलेली काही वाक्ये खरंचच कुणालाही अन कुठेही कायम कामा येतील इतकी ती वैश्वीक असतात. विषेशतः या वाक्यांचा वापर परीक्षेमध्ये निबंधात लिहितांना किंवा स्पर्धेत अथवा चर्चेत बोलताना केला कि,आपण सर्वसामान्यांतून वर आल्यासारखे वाटावे इतके सामर्थ्य या वाक्यांमध्ये असते! मला आठवते कि शाळेत निबंधाची तयारी करताना आम्ही अशी काही वाक्ये वेगळी लिहून ठेवली होती. ती वाक्ये अजूनही मी वापरतो, ती फ़क़्त कुठे लिहिण्या-बोलण्यासाठी नव्हे तर बऱ्याचदा नवीन गोष्टी समजून घेण्यासाठीदेखील!
यातली सर्वच वाक्ये अतिशय सुंदर संदेश देत असतात. काही वाक्ये इतकी समर्पक असतात कि त्यांचे प्रभावक्षेत्रही विश्वव्यापक असते. परंतु यातली काही वाक्ये समजणे हे म्हणावे तेवढे सोपे नसते-हे आत्ताशी माझ्या लक्षात येऊ लागले आहे! पंडित नेहरूंनी त्यांच्या 'The discovery of India' या नावाजलेल्या पुस्तकात लिहिले आहे कि- "Moral approach is conditioned by mental climate of the age ." नेहमीप्रमाणे हेही वाक्य मला आवडले. याचा मतितार्थ (तूर्तास जेवढा माझ्या लक्षात आला आहे तेवढा) असा कि बऱ्याच गोष्टींचे आकलन तसेच निर्णय हे माणसाच्या वयावर (अर्थात वयानुसार प्राप्त झालेल्या अनुभवावर अन समजुतीवर) अवलंबून असते.
शाळेत शिकत असताना आम्हाला सातवी-आठवीमध्ये 'मित्र' नावाचा श्री ना. सी. फडके यांचा धडा होता. त्यातले एक वाक्य मला फार आवडायचे "मैत्री म्हणजे फ़क़्त सहवासाच्या झाडावर हमखास उमलणारे फुल नव्हे." असेच काहीसे ते वाक्य सहवास नि मैत्री या नात्यावर प्रकाश टाकणारे होते. नंतर पुढे बारावीमध्ये असताना माझ्या एका आर्ट्स च्या मित्राकडून मी मराठीचे पाठ्यपुस्तक वाचण्यासाठी मागितले होते. त्यातही तोच 'मित्र ' नावाचा लघुनिबंध दिलेला होता. हे खंर आहे कि वाढत्या वयाबरोबर माणसाची आकलनक्षमताही वाढत असते अगदी तसेच वाढत्या वाचनासोबातही !! आज पुन्हा तोच 'मित्र' हा लघुनिम्बंध वाचताना काही नवीन पैलू लक्षात येतात. 'जोनाथन' या पक्षाची श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितलेली कथा पुन्हा-पुन्हा ऐकतांना दरवेळी नवीन बाबी लक्षात येत राहतात. अगदी तसेच या महापुरुषांच्या वाक्यांच्या बाबतीतही असते. महात्मा गांधी, सावरकर, भगतसिंग, डॉ आंबेडकर इ. . ना समजून घेतानाही आता नवीन गोष्टी लक्षात येताहेत. वाचनामुळे बरीच पुर्वग्रहे दूर होताहेत.
मला आठवते कि- शाळेत मराठीच्या पुस्तकात केव्हातरी आम्हाला श्री. जनार्दन वाघमारे यांचा 'महापुरुषांचा पराभव' नावाचा एक धडा/लघुनिबंध होता. त्यातले एक वाक्य असे होते- "थोर महापुरुषांच्या विचारांनादेखील काळाच्या मर्यादा असतात." त्यानुसार इथे आपण वर्तमानात जगतांना भूतकाळातील महान विचारांना जसेच्या तसे लागू करता येत नाही असे समजू शकतो. पण बऱ्याचदा अनेक विचारवंताना समजावून घेतांना तत्कालीन संदर्भ लक्षात घेणे गरजेजे असते. संदर्भ लक्षात न घेता एकतर आपण त्या वाक्यांचे महत्व/तीव्रता तरी कमी करतो अथवा वेगळाच असा अर्थ तरी त्यातून निर्माण करतो. आंबेडकरांचे 'one state one language', गांधीजींचे 'केवळ अहिंसा हाच एकमेव मार्ग ' अशी काही वाक्ये या प्रकारात मोडतात. बऱ्याचदा समरूप परिस्थितीच काही वाक्यांची तीव्रता/महत्व समजून येत असते. कसे विदेशात दूर असणाऱ्या व्यक्तीलाच सावरकरांचे ''ने मजसी ने परत मातृभूमीला '' हे व्यापक दृष्टीने समजत असेल.
सध्या मी मार्क्स, हेगेल, लेनिन,जॉन लेक, मकेवेलि, कौटिल्य, नेहरु, आंबेडकर, इ. विचारवंतांची राज्यशास्त्रसंबंधातील विचार वाचतोय. ते वाचतांना मनाला उमलण्याचा आनंद होत असल्याचे भासतेय. कदाचित याच विचारवंताना मी वयाची साठी उलटल्यानंतर वाचतांना नवीन बाबींचा साक्षात्कार होऊ शकेल, किंवा कदाचित यांवर मत करून तोपर्यंत काही नवीन विचारवंत उभे राहतील!! तूर्तास तरी मला हे वाचण्यात मजा येत आहे. मनाची/बुद्धीची नवी दारे उघडत आहेत. पूर्वी घराची आठवण येत नाही का? या प्रश्नांवर मी हो/नाही किंवा येत असली तरी काय करणार? अशी उत्तरे द्यायचो. आता मात्र त्याच प्रश्नांवर उत्तराचा विचार करताना माझे मन नेतृत्वं करू लागतं- त्या सर्व व्यक्तींचं - ज्यांना वर्षोनवर्षे दूर राहावे लागते घरापासून-तेही लढण्यासाठी; ज्यांना राहावे लागते दूर आपल्या घराच्या पोटासाठी, आणि ज्यांना स्वतःचे असे घरंच नाही-जन्मल्यापासून त्याचं.... बऱ्याचदा अशा वेळी पसायदानाच्या काही ओळी ओठांवर येत राहतात. अतिशय व्यापक अशा अर्थाचे हे पसायदान मी कितपत समजू शकलोय माहित नाही पण त्यामुळे माझ्या मनाला धीर मात्र मिळतो.
असो. मोबाइलवर मी नुकताच एक नवीन वालपेपर लागु केला आहे. कधीकाळी माझ्या मनात एका फार मोठ्या नायकाचे म्हणून स्थान असणाऱ्या हिटलरचे हे वाक्य आहे-
"If you don't like the rule - just follow it...
Reach the top- and change the Rule."
सध्यातरी माझ्या दिल्लीतील inevitable मुक्कामासाठी मला हे वाक्य प्रेरणा देत आहे. बाकी शक्य होईल तेव्हा लवकरच घरी जाईल एवढेच..!
*AMBITION*

Tuesday, 20 August 2013
MY VIEWS ..... AT NEWS
Every day i find 3 things in news paper
1) Few news good as a news but with little significance to common man.
2) Few bad news specially affecting somewhere to common man
Today also i came across a news with some statistical data about the attendance of our legislators in parliament. I think it is a second type of news. according to this news/data attendance of our so called great leaders in parliament is less than 50% !! It states that- attendance of Ms. Sonia Gandhi is 48% , Rahul Gandhi 43% while that of Mr L K Advani has 82%!!
I could not find a suitable reason about these huge number of absentees. It is not at all expected specially from those leaders who stays in Delhi and are considered to be the actual rulers of our country. let me compare it with our college and hostel days where we stayed in hostel but didn't attend the class though that was our need at that time. "Priority matters to every individual"- but what is priority for these political leaders is the matter of debate.
Today we not only have huge current account deficit but also posses some democratic deficit! In such situation- this kind of poor attendance in parliament is not only harmful for social welfare and national policies but also badly implies to our international relations. Today India's image in international community is very confusing and not very strong ! We have to work on it consistently. We all will be agree on it, that maximum attendance in parliament is vital for better democratic functioning. But i think unlike college students 'compulsion' is not the way. the actual way is to produce either a need,self compliance or a strong will ! Since compulsion will not provide quality.It is the will of a person which brings quality!!
Now another question arises - How to bring this will in our legislators?
1) By asking them to have study tour within and outside the country:
by this method, they will face the reality of -Development of people, within and outside the country.
2) By making them answerable to social media.
3) By increasing social awareness and demands.
Yes-There are many other questions also, about our politicians. but instead of checking the authenticity of such news or just leaving the topic by claiming it as endless and fruitless, one should think about it in many possible dimensions.
*AMBITION*
1) Few news good as a news but with little significance to common man.
2) Few bad news specially affecting somewhere to common man
and 3) Regular fact based news.

Friday, 9 August 2013
पाऊस, मी आणि आठवणी...
पाऊस, मी आणि आठवणी...
असो, उन्हाच्या या भल्या मोठ्या साम्राज्याला आव्हान देण्यास ती सावलीदेखील पुरेशी आहे. पण असंख्य जलधारांचा वर्षाव करणाऱ्या पावसाच्या काळ्याभोर मेघांना आव्हान देण्याचे सामर्थ्य कुणात? असा प्रश्न उद्भवने गैर नव्हे! शालेय शिक्षणात मी दरवर्षी असाच पावसावर निबंध लिहित आलोय. तशी दरवर्षीच माझी अन पावसाची मैत्री देखील वाढत आलीय.
या पावसाळ्याबद्दल कुणी कशाही विचारांचा असो, मी मात्र यासाठी नेहमीच उत्सुक असतो. पाऊस! ज्याच्या येण्याची कल्पना विजांच्या चमकण्यातून येते, ज्याचे सामर्थ्य ढगांचा गडगडाट सांगतो,असा हा पाऊस म्हणजे सम्राटच!! पावसाबद्दल एका पुस्तकात वाचेलेले वर्णन आठवते की-"नवऱ्याने मारले,राजाने हाकलले आणि पावसाने झोडपले तर कुणाकडे फिर्याद दयायची?'' परंतु जसं वर्णन केलं जातंय तसा तो काही हुकूमशहा (क्रूर शासक) किंवा भूकंप,ज्वालामुखी सारखा प्रकोप नव्हे!
" तो तर चराचर सृष्टीचा कणा आहे
त्याच्याशिवाय इथं जीवनास मना आहे,
सजीव सदाच चेहरे बदलत गेले -
पण हा पाऊस मात्र जुना आहे."
स्वर्ग पाहण्यास मिळावा अशी कुणाची इच्छा नसते? पण त्या स्वर्गासाठीही पुण्याईच्या शिदोरीची सोबत असावी लागते, याउलट पृथ्वीवरील स्वर्गाची प्रचीती देणारा हा पाऊस म्हणजे निसर्गातील अनमोल वरदानच! जीवनाला कंटाळल्लेल्या व मृत्यूची इच्छा झालेल्या एखाद्या व्यक्तीचे मन वळविण्यास या पावसाचे काही थेंबच पुरेसे असतात. अशा या प्रभावी पावसाच्या आगमनाच्या वेळी घडणारा प्रत्येक बदलाव हा सुखदायक असतो.
पावसाआधी आकाशात ढग गोळा झाले की,डोळ्यांवरील ताण कमी होऊन पापणी पूर्ण उघडते. पक्षांची किलबिल घराची आठवण करून देत असते. हवा थोडीशी कुंद होते,पाय वळण घेतात,पण मग मन वळत नाही. मन कश्याच्यातरी शोधात गुंतून जाते. श्वासांमधील बदल लगेच जाणवतो. तहानलेली माती,सारे भूचर,जलचर आणी वनचर प्राणी आता पावसाच्या प्रतीक्षेत असतात. आणि तो क्षण येताच श्वास फुलतो तो एका दैवी आविष्काराने- मृद्गंध ज्याचं नाव!!
"मृद्गंध"- निसर्गातील लाखो करोड जीवना पुन्हा पुन्हा लाभावा असा सुगंध. सर्वदूर पसरत सृष्टीतील साऱ्या सुगंधित फुलांच्या सत्तेवर वाजवी वर्चस्व करणारा हा मृद्गंध जणू काही दूरवरच्या स्वर्गाचे प्रतिनिधित्व करतोय असे भासते! मृद्गंधानंतर सुरु होतो विजांचा झगमगाट त्यानंतर ढगांचा गडगडात अन पावसाची सुरुवात. पावसाचे टपोर थेंब,सरींवर सरी-असंख्य सरी, आणि आता फक्त पाऊस-धो-धो कोसळणारा पाऊस!!
अशा या पावसामध्ये कधी कधी शहराबाहेरील उंच टेकडीवरून या मायावी शहरांकडे बघताना मात्र मनात विचार येतो की- का जगतात अशी माणसे ज्यांची कातडी तर जाड आहे पण त्यात चार थेंब झेलायचं सामर्थ्य नाही! का जगतात अशी माणसे जे ताटकळत बसतात तासनतास वाट पाहत पाऊस थांबायची! बाहेरच्या पावसाचा आवाजही ज्यांना आवडत नाही आणि घरात फक्त टीव्हीसमोर ज्याचं सर्व जग असतं,त्यांचे जीवनाबद्दलचे विचार काय आहेत हे त्यांनाच माहीत!! या लोकांनी कवी मंगेश पाडगावकरांचे "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे " हे गीत वारंवार ऐकावे असे मला वाटते. त्याच गीतातील 'चंचल वारा या जलधारा,भिजली काळी माती' या ओळी वाचून मनातल्या विचारांना जे वळण लागते त्यावर पाऊल ठेऊन बघावे.. मी त्यांना सांगेन कि विशेषतः शहरातल्या धावपळीतून थोडा वेळ काढून जरा आपल्या भोवती बघा. . . मित्रमंडळी,टीव्ही,घर,नातेवाईक याव्यतिरिक्त देखील आपल्यासाठी बरेच मित्र आहेत,जे नेहमीच काहीतरी भेट घेऊन येतात आपल्याला भेटायला. .
" बघायचंय त्या मित्रांना -
तर आभाळाकड बघा सताड डोळ्यांनी,
बघा पावसातील सरी बरसणाऱ्या,
बघा नदीकडे अवखळ वाहणाऱ्या ,
आणि बघा कधी सूर्याकडे-उगवणाऱ्या अन मावळणाऱ्या,
बघा... " रात्रीच्या पावसात उंच उंच इमारतींकडे
कसा रंगतो त्यांचा होळीचा खेळ,
रात्रीच्या पावसात बघा ... दूर जाणाऱ्या रस्त्याकडे
जो लुटतो पावसाचा आनंद अखंड पूर्ण वेळ."
एक विचार केला तर शहरात हजारो माणसे शेकडो विचारांची तसेच कधी कुणी काय करावे हा ज्याच्या त्याच्या मर्जीचाच प्रश्न.. तेव्हा त्यांच्या पसंतीमध्ये हस्तक्षेप करू पाहणाऱ्या मला, कुणी माझ्या पसंतीत हस्तक्षेप घेतला तर मला तरी चालेल का?
असो या पावसाने मला आजवर बरेच काही दिलंय! मी फार लहान होतो तेव्हा पावसामध्ये वाहत्या पाण्यात कागदाची होडी सोडतांना जे चार थेंब पाठीवर पडायचे त्यातच भिजल्याचा आनंद मिळायचा शिवाय जिंकल्याचाही!! आज मात्र मोठा झालो तसे मग फक़्त ओठांवर गाणी-"वो कागज कि कश्ती,वो बारीश का पानी ". . . .
माझ्या मते तरी,
"आजही राहवत नसेल कधी तर-मनसोक्त भिजावं पावसात,
अन जगावं अस्सल जगणं- पावसाळ्यातील दिवसात."
आजही मी चिंब भिजून घरी आलो आणि ग्यालरित उभा राहून चहा घेत होतो तेव्हा बाहेर मुसळधार पाऊस चालूच होता. समोरच्या घरातील तीन वर्षाचं मुल खिडकीतून बाहेरचा पाऊस बघत होतं. खिडकीबाहेर हात काढून पावसाचे थेंब पकडायचा प्रयत्न बहुदा ते करत असावं. मग तसा पाऊसही मुद्दाम थोडा तिरपा होऊन त्या चिमुकल्या हातांवर बरसात होता. या चिमुकल्याचं अन पावसाचं नातं काय? कशामुळे त्याचा चेहरा खुललाय? याचाच विचार करत मी पावसाकडे कितीतरी वेळ शुन्य दृष्टीने बघत होतो. काही वेळानंतर पाऊस मंदावला होता. रीमझीम रीमझीम करत रेंगाळणारा पाऊस जणू स्वतःचाच पराक्रम छाती फुगवून पाहत होता. वारा मात्र पावसाला सोबत घेऊन अजूनही लोकांना छ्ळत होता.
बऱ्याच वेळानंतर मग हा पाऊस थांबतो आणि तेव्हा सजलेली वसुंधरा पाहून सूर्यदेवही तिला सप्तरंगी इंद्रधनुष्याचा गजरा लावतात! सबंध सृष्टी हर्षोल्हासीत भासू लागते. वृक्षवेली, पाने, फुले, डोंगरदऱ्या, वस्त्या, आणि सारे सजीव नवीन वाटू लागतात. सर्वांच्या ठायी मात्र एक समानता,ती म्हणजे- सार्थकता !! समाधान ! तृप्ती!! आणि अशाच पावसानंतर अनुभवायला मिळतो तो गारवा!!!
"गारवा"- ज्याच्या केवळ स्पर्शानं अंग अंग रोमांचाने फुलून येते अन ज्याच्या सहवासात श्वास खोल होऊन डोळे उगीच ओलावतात! भारावलेल्या मनःस्थितीत सारी सृष्टी डोळ्यांत तरळू लागते अन उभ्या जागी डोळे नकळत मिटले जातात तो- पावसामधील गारवा! वाऱ्यांच्या सरींनी मनाला बेधुंद करतो तो गारवा अन ज्याच्या प्रत्येक स्पर्शातून सार्थकतेचा प्रत्यय येतो असा तो "पावसानंतरचा गारवा"!!
"गगनातही तो गारवा ,
तो वाऱ्यामध्येही गारवा ,
पाण्यातही तो गारवा ,
तो गाण्यामध्येही गारवा"!!!
वरती मोकळे आकाश आणि इथे स्पर्शणारा मोहक गारवा,अशा वेळी मग मन भटकतं ते दूरवरच्या दऱ्या-खोऱ्यांत! तिथला तो तलाव नेहमीच आजारी भासणारा; पण तोही आता त्याचे वाढलेले सामर्थ्य दूरवर पसरून दाखवीत असेल! स्वतःच्या पसरलेल्या हातांकरवी साऱ्या पक्षांना आपल्याकडे बोलावीत असेल! तिथला तो काळा पर्वतदेखील आता आळस सोडून वाऱ्यासवे आपले अंग झटकून देत असेल! आणि त्यासरशी शेकडो पक्षी आसमंतात झेप घेतील!! इंद्रधनुच्या सप्तरंगा भोवती घिरट्या घालत आपल्या नानाविध आवाजांनी त्यांनी तिथले आकाश दणाणून सोडले असेल!!!
" निनाद आसमंती
या मुक्त पाखरांचा
निःशब्द जीवनांस
सहवास या सुरांचा "
असे ते विहंगम दृश्य अन संगीतातील अलौकिक आवाज ऐकून कोण या सजीवांना मुके म्हणणार?
अशा या रोमांचक वातावरणात डोळ्यांसमोर अनेक चित्र उभी राहिली. मागील आठवडयात गेलो होतो तिथली ती नदीसुद्धा आज थोडी अवखळ वाहत असेल असं वाटू लागलं! समुद्राला भेटण्याची तिची आजची तळमळ प्रवाहाच्या वाढत्या वेगातून स्पष्ट दिसून येईल!! तसा तिकडे तो सागरही मग उंच उंच जाऊन नदीच्या प्रवाहाची आतुरतेने वाट बघत असेल !! सागर- मग तो कितीही खोल असला तरीहि या गारव्याच्या धुंदीत उमगणाऱ्या आकर्षणाला आणि नवचैतन्याला तो तरी कसा अपवाद असणार? अशी तर मनाला वेडावणारी धुंद असते या गारव्यात!!!!
पण, पण हीच वेळ जर रात्रीची असेल तर? तर हाच गारवा काट्यासारखा बोचतो! आठवणींचा ससेमिरा उगीच मागे लागतो. वर्ष-वर्ष मागे जाऊन स्मृतींमधील अनेकविध प्रसंग डोळ्यांसमोर येतात. अशा वेळी मन मात्र काही गुलाबी क्षणच आठवायचा प्रयत्न करीत असतं… पण- आडात नाही ते पोहऱ्यात कुठुन येणार? मग पुन्हा वाटतं की उद्या निदान आठवणी येण्यासाठी तरी आज कुणी असावं…
आठवण! एक गोड आठवण!
केवळ एक गोड आठवण दुःखाची शेकडो पर्वतं पार करण्याचे सामर्थ्य देते. आता मी एक फार्मसीचा विध्यार्थी आहे म्हणून नव्हे पण मला हे अगदी खरे वाटते कि आठवणी ह्या औषधासारख्या असतात-की ज्या कधी अमृतापेक्षाही गुणकारक तर कधी विषापेक्षाही घातक ठरतात!! आठवणी म्हणजे आयुष्यातील कटू-गोड प्रसंगांचे दर्शन घडविण्याचे सामर्थ्य असलेले आणि केवळ मनुष्य जातीस मिळालेले एक अद्भुत वरदान!! माझ्या मते-
"आठवणींत असावेत - दोन गोंधळलेले चेहरे
अन त्यांचे डोळ्यांमधले भाव,
काही अप्रिय क्षणांचे
मनावरील घाव…
आठवणी असाव्यात- काही अविस्मरणीय दिवसांच्या
ठराविक वेळेच्या, ठराविक ठिकाणांच्या…
आठवणी, मग त्या गुलाबी नसतील तरी चालेल,पण
आठवणींत असावे थोडे हसु
कुणाचे तरी ओठांत
आठवणींत असावे थोडे अश्रु
कुणाचे तरी डोळ्यांत …। "
कारण, या आठवणींवरच तर सारे जगतात. शिवाय हे सर्वश्रुत आहेच कि "आठवणींमुळे डोळ्यांच्या कडा ओलावतांना फार कमी वेळा आनंद होत असतो." शेवटी त्यालाही नशीब असावं लागतं !!
आता मात्र यापुढं ,
" येणाऱ्या पावसात - गुलाबी आठवणी साचावायच्या ,
अन गारवा तो कसा असतो- तो एकदातरी अनुभवायचा…"
आणि गुलाबी आठवणी लवकर नसतीलच भेटणार तर-
तर मग दरवर्षीच भेटू - " पाऊस आणि मी "
-साज
दिनेश दिगंबरराव ताठे
*AMBITION*
Subscribe to:
Posts (Atom)